Tue. Jul 27th, 2021

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस

मुंबई: मुंबई आणि उपनगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई आणि कोकण परिसरात ९ ते १३ जूनदरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून येत्या चार तासांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल,असा अंदाज वर्तवण्यात येत असून लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्कालीन प्रसंगाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *