Thu. Jan 20th, 2022

काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ गुरुवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन इंधन दरवाढ आणि महागाई कमी करण्याच्या मागणीचे निवेदन देणार आहेत. मलबार हिल येथील हँगींग गार्डन येथून काँग्रेस नेते सायकलने राजभवनावर जाणार आहेत.

महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. काँग्रेस पक्ष महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत असून गुरुवारी राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हँगिंग गार्डनपासून राजभवनपर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहे. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेल्या मोदी सरकारने जागे होऊन जनतेला दिलासा द्यावा यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.

‘लोकांचे जगणे मुश्किल केले आहे. कोरोना परवडला, परंतु महागाई परवडत नाही, अशी जनभावना तयार होऊ लागली आहे’, असं नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच २०२४ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल,दावाही नाना पाटोळे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *