Thu. Jun 17th, 2021

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभरात १२,२०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ३९३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यात सध्या १ लाख ६० रुग्ण उपचाराधीन आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी (गुरुवार):

मुंबई – ६६०
ठाणे – ४९८
रायगड – ५८०
नाशिक – १४९३
अहमदनगर – ७८४
पुणे शहर – ३६२
उर्वरित पुणे – ७४७
सातारा – ८४८
कोल्हापूर – १४४०
सांगली – १०४४

मुंबईमध्ये गुरुवारी ६६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर २२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. मुंबईत सध्या १५ हजार ८११ रुग्ण उपचाराधीन असून मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ४९८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच गुरुवारी दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *