Jaimaharashtra news

कोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात

कोल्हापूर: मराठा आरक्षण प्रकरणी कोल्हापुरात आजपासून आंदोलनाला सुरुवात होत आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजर्षी शाहू समाधी स्थळावरून आंदोलनाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. कोल्हापूरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज आंदोलन करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पर्याय शोधून मराठा आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारचीही आहे. या भूमिकेवर मराठा समाज ठाम असून या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बोलते करण्याचे आंदोलन छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हाती घेतलं आहे. संभाजीराजेंनी समाजाला शांततेत आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

या आंदोलनाचे रणशिंग कोल्हापुरच्या ऐतिहासिक राजर्षी शाहू समाधी स्थळावरून फुंकले जात आहे. जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यानंतर पुणे लाल महाल ते मुंबई विधान भवन लॉंग मार्च काढण्यात येणार आहे.

भाजपनेदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरसुद्धा आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Exit mobile version