Wed. Jul 28th, 2021

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होऊन चार महिने झाले आहे. राज्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे शिवाय आज राज्याने यामध्ये विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यासह देशात १६ जानेवारीला प्रारंभ झाला असून महाराष्ट्रात त्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले. को-विन अॅपमधील तांत्रिक गोंधळ वगळता लसीकरणामध्ये आतापर्यंत फारशी अडचण नाही. मात्र लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं नागरिकांना अनेक अडणाचा सामना करावं लागत आहे. गेल्या दोन दिवस लसीकरण बंद पडल्यानं गोंधळ उडाला होता. त्यावरही राज्यानं मात केली आहे. लसीकरणामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.

शिवाय आतापर्यंत राज्यात १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं असून याविक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *