राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. तसेच ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन आणि राज्यातील पुढच्या टप्प्यातील लसीकरणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १ मे सकाळी सात वाजेपर्यंत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. शिवाय या निर्बंधांबाबत १३ एप्रिल रोजी एक आदेश काढण्यात आला होता. त्यानंतरही गर्दी कमी होत नसल्यानं सुधारित आदेश काढून २२ एप्रिलपासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले होते. मात्र तरीही कोरोना हा आटोक्यात आला नाही यावर राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याचं सांगितलं आहे.

या लॉकडाऊनमध्ये पूर्वीच्या लॉकडाऊनसारख्याच गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. सामान्यांना लोकल रेल्वे, मेट्रो आणि मोनो सेवेची दारे बंद करण्यात आली आहे तर एका शहरातून दुसऱ्या शहरात व एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यावरही बंधने आणली गेली आहेत. अत्यावश्यक कारणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात वा दुसऱ्या राज्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीही करण्यात आली आहे. राज्याची परिस्थिती ही दिवसेंदिवस भयंकर होत असल्यानं हा निर्णय जारी केला आहे.

‘ब्रेक द चेन’ मोहिम

१ राज्यात आज रात्री ८ वाजता पासून कडक निर्बंध लागू होणार आहे

२ सकाळी १ मेपासून कडक निर्बंध लागू

३ सरकारी कार्यालयात १५% कर्मचारी असल्याचा आदेश जारी

४ लग्न समारंभात २५ लोक उपस्थिती

५ दोन तास लग्न उरकावं लागेलं

६ राज्यात सरकारी बसमध्ये ५०% प्रवासी

७ लग्न समारंभात जर नियम पाळले नाही तर ५० हजार दंड

Exit mobile version