महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत कठोर निर्बंध राहण्याची शक्यता

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सध्या संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून आणखी काही जिल्हे १० ते १५ दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात १५ मे नंतरही कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे.

सरकारला यंत्रणा मजबूत करण्यासाठी वेळ लागणार असून ऑक्सिजनची उपलब्धता तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. १५ मे नंतर सर्व व्यवहार सुरू केले तर साथ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती आहे तशीच कायम ठेवत जिल्हाधिकाऱ्यांना टाळेबंदी जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती

राज्यभरातील कोरोनाचा उद्रेक तसेच जुलैमध्ये येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सोमवारी स्थगिती देण्यात आली. चालू आर्थिक वर्षांतील कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या येत्या ३० जूनपर्यंत बदल्या करू नयेत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सहकारी मंत्र्यांना दिले आहेत. जूनअखेर राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन बदल्यांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version