Sun. May 9th, 2021

Maharashtra Budget 2019 : आ. प्रकाश गजभिये शेतकऱ्याच्या वेषात!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचा दिववस अर्थसंकल्प मांडण्याचा होता. यावेळी  राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये विधानभवनात चक्क शेतकऱ्याच्या वेषात आले. शेतकऱ्यांच्या भावना मांडण्यासाठी आपण खास शेतकरी वेष धारण केला असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार प्रकाश गजभिये यापूर्वीही अनेकदा विविध वेषात विधानभवनात शिरले आहेत.

गजभियेंनी बरेचदा केले वेषांतर

आमदार प्रकाश गजभिये यांनी याआधीही बरेचदा विधानभवनात वेषांतर केले होते.

यापूर्वी पावसाळी अधिवेशनात ते संभाजी भिडे यांच्या वेषात ते अवतरले होते.

तसंच संत तुकाराम यांच्या वेषातही गजभिये एकदा विधानभवनात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषातही गजभिये विधानभवनात आले होते.

यामुळे गजभियेंनी अनेकदा वादही ओढावून घेतलाय.

 

शेतकरी वेषात गजभियेंचा सरकारवर हल्लाबोल

आज ‘मराठी राजभाषा दिन’ आहे.

संपूर्ण राज्य याचा आनंद साजरा करत असताना, माझा शेतकरी मित्र मात्र झुरून मरत आहे.

मंत्रालय हे त्यांच्या आत्महत्येचे स्थळ बनले आहे

शेतकऱ्यांना प्रति महिना 5,000 रुपये पेन्शन द्यावेत.

हे सरकार असंवेदनशील आहे.हे सरकार फक्त डिजीटल आहे.

माझ्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे बजेटमध्ये आहे, हे पाहण्यासाठी मी आलो आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी मी खास त्यांच्याच वेषात आलो आहे.

हे सरकार नावापुरतेच डिजीटल सरकार आहे.

या डिजीटलायझेशनमधून माझ्या शेतकरी बांधवाला वेगळे काढले जाते.

शेतकऱ्यांची एका दिवसाचा रोजगार फक्त 16 रुपयेच आहे आणि हे अजिबात योग्य नाही.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हायलाच हवी

कवितांमधून शेतकऱ्यांची कळकळ

“लाभले भाग्य आम्हांस मुख्यमंत्री मराठी,

विष घ्यावे लागते कर्ज माफीसाठी ”

अशा विडंबनात्मक कवितेतून गजभिये यांनी शेतकऱ्यांची कळकळही व्यक्त केली.

“घरी जागाच नाही,तर डिजिटल खात्यात सरकार पैसे जमा करत नाही. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर सरकारने वेळीच पाऊल उचलावं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हायलाच हवी”, असेही गजभिये या वेळी म्हटले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *