Jaimaharashtra news

मनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तरुणींना चित्रपटामध्ये काम देतो असं सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या परप्रांतीयांना ठाण्यातील घोडबंदर येथे चांगलाच चोप दिला. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीच दिली आहे.

उत्तर प्रदेशमधील या तरुणांनी मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याने सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चौघांना रंगेहात पकडलं आणि चोप दिला. त्यानंतर या चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अमेय खोपकर यांनी आपल्या काही व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

Exit mobile version