Fri. Sep 30th, 2022

मराठा समाजाचा एल्गार! ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’

कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात भर पावसात मूक आंदोलन सुरु आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे मूक आंदोलन होत आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली असून या आंदोलनात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, युवराज मालोजीराजे छत्रपती हे सहभागी झाले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरात आज मूक आंदोलन होत आहे. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर संभाजीराजे यांनी आंदोलकांना आवाहन केलं. ‘आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या’, असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं.

दरम्यान, आंदोलनाला सुरुवात होण्याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरातील आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं पत्र संभाजीराजे यांना दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.