Gold rate today: भारत-पाकिस्तान दरम्यानचे सध्याचे वाढते तणाव, सीमावर्ती भागातील चकमकी आणि राजकीय उलथापालथ यामुळे देशात आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहू लागले आहेत. परिणामी, सोन्याची मागणी वाढत असून त्याचा थेट परिणाम म्हणजे भारतीय बाजारात सोन्याचे दर झपाट्याने वाढले आहेत. आज (13 मे 2025) रोजी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹8,780 तर 24 कॅरेटचा दर ₹9,577 वर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील सोन्याचा दर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये; मुंबई, पुणे, नागपूर येथे आज सोन्याचे दर समसमान आहेत. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹8,765 आहे, तर 24 कॅरेटचा दर ₹9,562 आहे. पुणे आणि नागपूरमध्ये देखील हे दर याच पातळीवर आहेत. लग्नसराई सुरु झाल्याने राज्यभरात सोन्याची मागणी वाढली असून, त्यामुळे किंमतीत स्थिर वाढ पाहायला मिळत आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
आज भारतात बहुतांश शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ₹8,765 ते ₹8,780 च्या दरम्यान आहे, तर 24 कॅरेटसाठी ₹9,562 ते ₹9,577 पर्यंत पोहोचला आहे.
प्रमुख शहरांनुसार दर पुढीलप्रमाणे:
दिल्ली: 22 कॅरेट- ₹8,780 / 24 कॅरेट - ₹9,577
मुंबई: 22 कॅरेट- ₹8,765 / 24 कॅरेट - ₹9,562
पुणे: 22 कॅरेट- ₹8,765 / 24 कॅरेट - ₹9,562
अहमदाबाद: 22 कॅरेट- ₹8,770 / 24 कॅरेट - ₹9,567
बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद: 22 कॅरेट- ₹8,765 / 24 कॅरेट - ₹9,562
इंदौर, लखनौ: 22 कॅरेट- ₹8,770-₹8,780 / 24 कॅरेट - ₹9,567-₹9,577
दरवाढीमागची कारणे
भारतात सोन्याचे उत्पादन मर्यादित असल्यामुळे बहुतांश सोनं आयात केले जाते. जागतिक बाजारात सोन्याचा व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होतो. त्यामुळे डॉलरची किंमत वाढली की भारतातील सोन्याचे दरही वाढतात. शिवाय, आयात कर, जीएसटी आणि अन्य स्थानिक करांमुळे ग्राहकांना जास्त दराने सोने विकत घ्यावे लागते.
सोन्यात गुंतवणुकीचा विश्वास
अशा काळात गुंतवणूकदार सोन्याला आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक मानतात. सोन्याची किंमत दीर्घकालीनदृष्ट्या स्थिर व वृद्धिंगत राहिलेली असल्याने अनेक लोक त्यात गुंतवणूक करतात. आता डिजिटल गोल्ड, गोल्ड बॉण्ड्स, आणि ETF सारख्या पर्यायांमुळे ही गुंतवणूक आणखी सोपी झाली आहे.