Monday, June 23, 2025 12:49:48 PM

'अटकेपूर्वी शिंदेंनी मला केला फोन'; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

शनिवारी, शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदारांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. 'ईडीकडून अटक होण्यापूर्वी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता.

अटकेपूर्वी शिंदेंनी मला केला फोन संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई: शनिवारी, शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदारांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. 'ईडीकडून अटक होण्यापूर्वी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. मला म्हणाले की, ''मी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत बोलू का?''. यावर मी शिंदेंना म्हणालो की, ''याची काहीच गरज नाही. जरी तुम्ही माझ्याबद्दल वरती बोलला तरी सुद्धा मी तुमच्या पक्षात येणार नाही'' ', असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. शनिवारी, खासदार संजय राऊत लिखित 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं प्रकाशन आहे. तसेच, या पुस्तकात राऊतांनी अनेक खुलासे आणि दावे केले आहेत.

अटकेपूर्वी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना केला होता फोन:

'मला अटक करण्यापूर्वी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रात्री 11 वाजता फोन केला होता, मात्र तेव्हा ते कामात होते. 4 मिनिटांनंतर अमित शाह यांचा मला कॉल आला होता. मला विचारले, ''बोलो संजय भाई''. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ''माझ्या मित्रावर रेड पडत आहे. हे तुमच्या मंजुरीने होत आहे. जर मलाच अटक करायची आहे तर मी दिल्लीच्या घरी आहे. ही नौटंकी बंद करा'', असं मी अमित शाह यांना म्हणालो. तेव्हा ते म्हणाले की, ''मला याबद्दल काहीच माहित नाही''. तर मी अमित शाह यांना विचारले की, ''माझ्या कुटुंबियांना का त्रास दिला जात आहे?'' ', असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

अमित शाहांमुळेच शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता:

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत म्हणाले की, 'अमित शाहांमुळेच शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता निर्माण झाली आहे, हे मी 100% खात्रीने सांगतो. एकेकाळी आमचे आणि भाजपचे चांगले संबंध होते. इतकंच नाही, तर तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुद्धा आमचे चांगले संबंध होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीमध्ये सक्रिय झाले आणि हळूहळू दोन्ही पक्षांमध्ये कटुता निर्माण झाली. तेव्हा काही भाजप नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना असं देखील सांगितले होते की, ''तुम्ही असं काही करू नका''. अरुण जेटली यांनी अमित शाह यांना म्हणाले होते की, ''महाराष्ट्रात शिवसेनेसोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे तुम्ही असं करू नका'' ', असा दावा खासदार संजय राऊतांनी केला.


सम्बन्धित सामग्री