Friday, February 13, 2026 12:58:38 AM

आश्चर्य! आजीला नवीन लुगडं नेसवलं, हात-पाय बांधले...; अंत्यविधी होणार इतक्यात आजीनं दीर्घ श्वास घेतला...

रामटेकमध्ये मृत समजलेली 103 वर्षांची वृद्धा गंगाबाई साखरे यांनी मृत्यूला हुलकावणी दिली.

आश्चर्य आजीला नवीन लुगडं नेसवलं हात-पाय बांधले अंत्यविधी होणार इतक्यात आजीनं दीर्घ श्वास घेतला

रामटेक : रामटेकमधील एका 103 वर्षीय वृद्ध आजीने चक्क मृत्यूला हुलकावणी दिल्याची माहिती समोर आली आहे. या वृद्ध आजीने नाव गंगाबाई साखरे असून तिच्या अंत्यविधीवेळीचं ती जीवंत असल्याचे निदर्शनास आहे. सोमवार, 12 जानेवारी रोजी सायंकाळी शरीराची हालचाल थांबल्याने या आजीचा मृत्यू झाल्याचे समजून तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली. आजीला नवीन लुगडं नेसवलं, हात-पाय बांधले, नाकात कापूस ठेवण्यात आला होता. सोशल मीडियावर निधनाची बातमी पसरली, दूरदूरचे नातेवाईक अंत्यविधीसाठी पोहोचायला सुरूवात झाली. मंगळवारी सायंकाळी नातू राकेश साखरे यांच्या लक्षात आले की आजीच्या पायाची हालचाल होत आहे. नाकातील कापूस काढताच गंगाबाईंनी जोरात श्वास घेतला. त्यामुले आजी मृत नसून जीवंत असल्याचे समजले. क्षणात घरातील शोकाचे वातावरण आनंद आणि आश्चर्यात बदलले. शववाहिनी परत पाठवण्यात आली, शोकमंडप गुंडाळण्यात आला. आजीच्या जीवंत असल्याच्या चमत्काराने साखरे कुटुंबात आनंद परतले. आजीला विचारले असता, देवानं काही दिवसांची सुटी दिली असल्याचे तिने म्हटले. 

हेही वाचा : BMC Elections 2026: पहिलं मतदान, मोठी जबाबदारी ! BMC निवडणूक 2026 मध्ये पहिल्यांदा मत देणाऱ्यांनी काय लक्षात ठेवावे? जाणून घ्या



सम्बन्धित सामग्री