Saturday, February 14, 2026 10:35:06 AM

Ambulance Stuck In Traffic Jam: वसईत रुग्णवाहिका ट्राफिकमध्ये अडकल्याने 2 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; स्थानिकांनी व्यक्त केला संताप

रुग्णवाहिका मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सुमारे पाच तास अडकली. या वाहतूक कोंडीमुळे रायनला वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत.

ambulance stuck in traffic jam वसईत रुग्णवाहिका ट्राफिकमध्ये अडकल्याने 2 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू स्थानिकांनी व्यक्त केला संताप

Ambulance Stuck In Traffic Jam: वसई परिसरात गुरुवारी एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरवून टाकले. पेल्हार भागातील रायन शेख हा 2 वर्षांचा मुलगा चौथ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ताबडतोब जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात नेले, जिथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला. 

दरम्यान, रुग्णवाहिका मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सुमारे पाच तास अडकली. या वाहतूक कोंडीमुळे रायनला वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत. रायनची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला जवळच्या ससूनघर गावातील लहान रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा - Maharashtra ST Workers Strike: सणासुदीच्या काळात वाहतूक ठप्प होणार? एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

यावेळी मुंबई ते गुजरात मार्गांवर 20 ते 25 किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे चिमुरड्याला आपल्या कुटुंबासमोर प्राण सोडावे लागले. घटनेनंतर स्थानिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. नागरिक आणि स्थानिक रहिवासी महामार्गाच्या देखभालीतली असमर्थता, वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना प्राधान्य न देण्याबाबत संताप व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! ठाणे मेट्रो लाइन-4A ट्रायल रनसाठी सज्ज; वाहतूक कोंडीची कटकट लवकर संपणार

रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने चिमुरड्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी प्रशासनाला वाहतूक नियंत्रण व आपत्कालीन सुविधा सुधारण्याची तातडीची गरज असल्याचे आवाहन केले आहे. ही घटना वाहतूक निष्काळजीपणाचे भयानक उदाहरण म्हणून समोर आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.


सम्बन्धित सामग्री