Saturday, June 14, 2025 03:52:19 AM

हृदयद्रावक! लोकलमधून उतरताना लोखंडी कुंपणात अडकली मान; 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

चुकीच्या बाजूने येणाऱ्या लोकल ट्रेनमधून उतरताना एका 27 वर्षीय तरुणाची मान लोखंडी कुंपणात अडकली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील स्टेशनवर सकाळी 9.45 वाजता ही घटना घडली.

हृदयद्रावक लोकलमधून उतरताना लोखंडी कुंपणात अडकली मान 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Mumbai Local
Edited Image

मुंबई: मुंबईमधून अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे.  गुरुवारी सकाळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर दुर्दैवी घटना घडली. चुकीच्या बाजूने येणाऱ्या लोकल ट्रेनमधून उतरताना एका 27 वर्षीय तरुणाची मान लोखंडी कुंपणात अडकली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील स्टेशनवर सकाळी 9.45 वाजता ही घटना घडली.

हेही वाचा - 'युतीबाबत दोन्ही भावांनी फोनवरून चर्चा करावी'; पुतण्याचा काकांना सल्ला

तरुण विरुद्ध दिशेने उतरण्याचा प्रयत्न करत असताना, त्या व्यक्तीची मान कुंपणात अडकल्याचे रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्याला नायर रुग्णालयात नेण्यात आले जिथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

हेही वाचा - मुंबई महापालिकेसाठी भाजपानं कसली कंबर; शेलारांच्या उपस्थितीत बैठक पार

त्याच ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी सांगितले की, पीडित व्यक्ती विरुद्ध बाजूने उतरण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान, त्याची मान कुंपणात अडकली आणि तो जखमी झाला. या घटनेमुळे स्टेशवर बऱ्याचं काळ गोंधळ उडाला होता. तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लोकल प्रवासादरम्यान, प्रवाशांनी चढताना तसेच उतरताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.  
 


सम्बन्धित सामग्री