Saturday, June 14, 2025 03:34:47 AM

किरकोळ कारणावरून 5 जणांवर प्राणघातक हल्ला; बीडच्या अंमळनेरमधील घटना

किरकोळ कारणावरुन पाच जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीडच्या अंमळनेरमधील ही घटना घडली आहे.

किरकोळ कारणावरून 5 जणांवर प्राणघातक हल्ला बीडच्या अंमळनेरमधील घटना

बीड : किरकोळ कारणावरुन पाच जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीडच्या अंमळनेरमधील ही घटना घडली आहे. 
बीडच्या अंमळनेर येथे पाच जणांवर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उभ्या पिकात ट्रॅक्टर का घातले? असा जाब विचारत लाठ्या कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये दोन वृद्धांसह इतर तिघे जखमी असून एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : धनंजय मुंडेंच्या मंत्रालयातील दालनाची सफाई सुरू; मुंडेंचं दालनच भुजबळांना मिळण्याची शक्यता

बीडमध्ये पिकात ट्रॅक्टर घातला या कारणावरुन लाठ्या आणि कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन वृद्धांसह इतर तिघे जखमी असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. दरम्यान प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.         

बीडमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे हा गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. बीडमध्ये दिवसेंदिवस अनेक गुन्हेकारीच्या घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे जनतेचा बीडकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. 


सम्बन्धित सामग्री