Monday, June 23, 2025 12:44:41 PM

महाराष्ट्रात 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद! एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली

1 जून रोजी महाराष्ट्रात 65 नवीन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली
Corona patients In Maharashtra प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात केरळ तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. 1 जून रोजी महाराष्ट्रात 65 नवीन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली आहे. या 65 रुग्णांमध्ये पुण्यातील 31, मुंबईतील 22, ठाण्यातील नऊ, कोल्हापूरमधील दोन आणि नागपूरमधील एकाचा समावेश आहे. जानेवारीपासून कोविडमुळे एकूण 8 मृत्यूंची नोंद झाली आहे. 

तथापि, देशात कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांच्या पुढे गेली आहे. रविवारी सकाळपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या 3395 इतकी होती. यामध्ये सर्वाधिक रुग्ण केरळमधील आहेत. रविवारी सकाळपर्यंत केरळमध्ये 1336 सक्रिय रुग्ण होते.

हेही वाचा - मुसळधार पावसाचा परिणाम; कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पालकचे दर गगनाला भिडले

भारतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी केरळमधील त्रिशूर येथे आढळला. येथे चीनमधील वुहान येथून परतलेल्या 20 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्याची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली. मार्च 2020 पासून रुग्णांची संख्या वाढली आणि ती एप्रिल 2020 पर्यंत देशभर पसरली.

हेही वाचा - डॉक्टरांचा हलगर्जीपणा; प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा

कोरोनाची पहिली लाट - 

दरम्यान, भारतात 2020 मध्ये कोरोनाची पहिली लाट आली. या काळात सरकारने 24 मार्च 2020 रोजी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन लागू केला होता. 2020 च्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. तसेच कोरोनाची दुसरी लाट 2021 मध्ये आली. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा खूपच विनाशकारी होती. 
 


सम्बन्धित सामग्री