Wednesday, June 18, 2025 03:30:29 PM

कर्जबाजारीपणाला कंटाळून 65 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून 65 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथे सोमवारी दुपारी 4:15 वाजता घडली आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून 65 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: कर्जबाजारीपणाला कंटाळून 65 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथे घडली आहे. ही घटना सोमवारी दुपारी 4:15 वाजल्याचा सुमारास घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव अंकुश रंगनाथ ताकपीर (वय: 65, रा.वडजी, ता.पैठण) आहे. 

नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या पैठण तालुक्यातील वडजी येथील शेतकरी अंकुश रंगनाथ तकपीर यांच्याकडे स्वतःची काही जमीन आहे आणि ते स्वतःच्या जमिनीसह इतर ठिकाणी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे शेतीचा खर्च उत्पादनातून भागत नसल्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. अशातच, सोमवारी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य कामानिमित्त गावाबाहेर गेले होते. 

हेही वाचा: उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजात संवेदनशीलता निर्माण करणं गरजेचं; मनसे नेते अमित ठाकरेंचे मोदींना पत्र

जेव्हा शेतकरी अंकुश तकपीर यांचे भाऊ दुपारी 4:15 च्या सुमारास घरी आले, तेव्हा त्यांनी पहिले की, 'आपला भाऊ अंकुश तकपीर यांनी त्यांच्या राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली'. तेव्हा, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी या घटनेची माहिती गावातील पोलीस आणि गावकऱ्यांना दिली. तसेच, गावकऱ्यांनी शेतकरी अंकुश तकपीर यांना घेऊन पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार किशोर शिंदे, पोलिस नाईक चरणसिंग बालोदे करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री