Thursday, May 15, 2025 12:29:56 AM

महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना मुंबईत आणले जाणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत जम्मू काश्मीरमध्ये प्रवाशांची यादी जाहीर केली आहे. या प्रवाशांना मुंबईत आणण्यासाठी श्रीनगरहून मुंबई विमान व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना मुंबईत आणले जाणार मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत जम्मू काश्मीरमधील प्रवाशांची यादी जाहीर केली आहे. या प्रवाशांना मुंबईत आणण्यासाठी श्रीनगरहून मुंबई विमान व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना मुंबईत आणले जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याची संपूर्ण माहिती पोस्टद्वारे दिली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर, गुरुवारी 24 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.

गुरुवारसाठीच आणखी एक विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असून त्यासाठीच्या प्रवाशांची यादी सुद्धा तयार होते आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

हेही वाचा : Pahalgam Terror Attack: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरकडे रवाना

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृतांमध्ये समावेश आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या आहेत. या दहशतवादी हल्ल्याची दखल घेऊन राज्य सरकारने मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  तसेच जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 


सम्बन्धित सामग्री