Saturday, February 14, 2026 10:16:55 PM

Jay Ajit Pawar : दादांच्या आठवणीत जय पवार भावूक; सोशल मीडियावर शेअर केला अजित पवारांसोबतचा 'तो' फोटो अन् लिहिलं...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जय पवार यांनी एक्स अकाउंटवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

jay ajit pawar  दादांच्या आठवणीत जय पवार भावूक सोशल मीडियावर शेअर केला अजित पवारांसोबतचा तो फोटो अन् लिहिलं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच संपूर्ण राज्यभरात अजित दादांच्या जाणाण्याने शोकाकुल व्यक्त केली जात आहे. असं असताना अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवर पिता अजित पवारांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी पोस्ट केलेले हे फोटो पाहून अजित पवारांचा कार्यकर्तावर्ग भावूक झाला आहे.  

हेही वाचा- Maharashtra Government Cancel Cabinet Meeting : अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठक होणार नाही?
यावेळी जय पवार यांनी पोस्टमध्ये लिहले की, "Dad काश वेळ थांबली असती.. मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो" असं लिहित पुढे जय पवार यांनी हार्ट इमोजी शेअरे केला आहे. तसेच त्यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांनी "मिस यू अ लॉट डॅड" असं कॅप्शन दिलं आहे. जय पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला पिता अजित पवारांसोबतचा हा फोटो जय पवार यांच्या लग्न सोहळ्यातील असल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. या फोटोमध्ये जय पवार हे अजितदादांना गच्च मिठी मारुन उभे आहेत. जय पवारांची ही पोस्ट पाहून कोणाच्याही डोळ्यात टचकन पाणी येईल. आपल्या पित्यासाठी असलेले अपार प्रेम आणि निष्ठा याबाबत जय पवार यांनी मनातील भावना कॅप्शन म्हणून फोटोवर लिहिल्या आहेत. 


सम्बन्धित सामग्री