Disha Salian, Aditya Thackeray
Edited Image
मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदित्य ठाकरे मुंबई उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात अखेर न्यायालयाने आपल्या महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुंबई पोलिसांनी एक शपथपत्र दाखल करून उच्च न्यायालयाला सांगितले होते की दिशा सालियन मृत्यू प्रकरणात संशयाचे प्रश्नच उद्भवत नाही. हा एक अपघाती खटला आहे आणि सामूहिक बलात्काराच्या तपासासाठी कोणताही कायदेशीर आधार नाही. दिशा सालियनच्या वडिलांच्या याचिकेला उत्तर म्हणून हे शपथपत्र दाखल करण्यात आले आहे.
दिशाच्या वडिलांनी ठोठावला होता उच्च न्यायालयाचा दरवाजा -
दरम्यान, मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दिलेले हे शपथपत्र दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून आहे. दिशाच्या वडिलांनी मार्च 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या एसआयटी आणि सीबीआयकडून करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
हेही वाचा - 'आय लव्ह यू' म्हणणे छेडछाड किंवा लैंगिक छळ नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
मुलीची हत्या झाल्याचा वडिलांचा दावा -
दिशा सालियनच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला होता. तथापी, दिशाचे वडिल राजकीय दबावातून हे करत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी लावला होता. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्कार आणि हत्येतील भूमिकेवरही शंका व्यक्त केली होती. तसेच त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.
हेही वाचा - बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवली; राणेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मालवणी पोलिसांनी दिला क्लोजर रिपोर्ट -
तथापी, मुंबईच्या मालवणी पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट जारी केला होता. त्यांनी क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाच्या आत्महत्येमागील कारण तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले होते. एबीपीच्या वृत्तानुसार, आता मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिशा सालियनच्या वडिलांनी त्यांच्या याचिकेत केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.