मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येचा सूत्रधार झीशान अख्तर याला कॅनेडियन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. झीशान अख्तर सध्या कॅनेडियन पोलिसांच्या ताब्यात आहे. झीशान हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येत सहभागी असलेल्या गोळीबार करणाऱ्यांचा मास्टरमाइंड झीशान अख्तर होता.
कोण आहे झीशान अख्तर कोण आहे?
झीशान अख्तर मूळचा जालंधरचा आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येमागे झीशान मास्टरमाइंड असल्याचं सांगण्यात येत आहे. जालंधरचा रहिवासी झीशान अख्तर, ज्याचे खरे नाव मोहम्मद यासीन अख्तर आहे, त्याला 2022 मध्ये पंजाब पोलिसांनी अटक केली होती. बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या सुरू असलेल्या तपासात झीशान अख्तरचे नाव पुढे आले. तो प्रामुख्याने धर्मराज कश्यप, गुरमेल बलजीत सिंग आणि शिवकुमार गौतम या तीन गोळीबार करणाऱ्यांचा हँडलर होता.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण -
जालंधर पोलिसांनी झीशान अख्तरवर आधीच अनेक गुन्हे दाखल केले होते. झीशान अख्तर आणि गुरमेल सिंग हे एकेकाळी पंजाबमधील जालंधर तुरुंगात साथीदार होते. अख्तरला जालंधरमधील दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले होते, परंतु त्याआधी त्याने गुरमेल सिंगशी सिद्दीकीच्या हत्येबद्दल चर्चा केली होती.
हेही वाचा - मराठी भाषेवरून पुन्हा गोंधळ! SBI अधिकाऱ्याला शिवसेना UBT गटाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण
झीशान आणि लॉरेन्स बिश्नोईचा संबंध -
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्र आणि तपासानुसार, झीशान अख्तर लॉरेन्स बिश्नोईच्या खूप जवळचा असल्याचे उघड झाले. गेल्या वर्षी मे महिन्यात झीशान अख्तर आणि शुभम लोणकर यांना बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी संपूर्ण नियोजन केले. गोळीबार करणाऱ्यांना आवश्यक शस्त्रे आणि राहण्याची व्यवस्था करण्यात मदत केल्यानंतर, तो हत्येच्या सुमारे एक महिना आधी मुंबई सोडून गेला.
हेही वाचा - Pune: वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून पोलीस हवालदार बेपत्ता
दरम्यान, पंजाब तुरुंगात असताना झीशान अख्तरने लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संपर्क साधला, ज्याने त्याला बाबा सिद्दीकीला मारण्याचे कंत्राट दिले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर, झीशान अख्तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी गुरमेलला भेटण्यासाठी हरियाणातील कैथल येथे गेला. त्यानंतर, त्याने गुरमेल, धर्मराज आणि शिवकुमार गौतम यांना मुंबईत आणले आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली.