महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दादांच्या निधनानंतर राजकिय वर्तुळात अनेक विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावरून आता शरद पवारांनी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबतही भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. याला दोन्ही राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनीसुद्धा दुजोरा दिला. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. यानंतर आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
हेही वाचा- NCP National President : प्रफुल पटेल यांची NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ?; वाचा काय म्हणाले प्रफुल पटेल
यावेळी फडणवीस म्हणाले की, "जर विलिनीकरणावर कोणती चर्चा झाली असती तर ती अजित पवारांनी भाजपला सांगितली असती. चर्चा करायची, विलिनीकरण करायचं हे सर्वस्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे. जर त्यांना विलिनीकरण करायचं असेल तर त्यांनी आधी भाजपशी याबाबत चर्चा करावी. अशी आमची अट आहे. अजित पवार अशा चर्चा करत होते ते काय सरकारमधून बाहेर पडण्यासाठी करत होते का? ते तर सरकारमध्ये रुळलेले होते. त्यामुळे काही तरी गोंधळ निर्माण करून आपल्या संस्थेचा वापर करून तो गोंधळ जनतेपर्यंत पोहचवायचा. आताच्या परिस्थितीत आम्हाला ही राजकारण करायचं नाही. नाही तर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलं आहे? काय घडतं आहे? मला सगळ दिसतंय... मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. माझे आणि अजित दादांचे जे संबंध होते ते मला सगळ सांगायचे. त्यांचा ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी ही आम्ही जवळपास एक तास गप्पा मारत होतो. मला असं वाटतं की, या गोष्टीत खालच्या स्थाराच राजकारण करण योग्य नाही. एक लक्षात ठेवा की, आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल." असं देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर सांगितले.
हेही वाचा- Amol Mitkari on Ajit Pawar pawar plane crash: अजित पवारांच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू पण 5 मृतदेह, अमोल मिटकरींनी उपस्थित केले मोठे सवाल
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर फडणवीस म्हणाले की, "अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने असा निर्णय घेतला की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेण्यासाठी पुढे कराव. हा त्यांच्या पक्षातील लोकांचा निर्णय आहे. आमचा मित्रपक्ष हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे. त्यामुळे ते जे निर्णय घेतील त्याला पाठिंबा देण ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही कालही निभावली आजही निभावू."