आज 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार याकडे देशातील नागरिकांचं लक्ष लागलं होत. विमा, सोनं-चांदी, शेतकऱ्यांसाठी कोणत्या मागण्या जोर धरणार? याची उत्सुकता लोकांच्या मनाला लागली होती. अशातच गुंतवणूकदार आणि सोने-चांदीच्या खरेदी करणाऱ्या सामान्य खरेदीदार यांच्यासाठी मोठी बातमी देशाच्या अर्थसंकल्पातून समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. असं असताना जानेवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात सोने दीड लाखांच्या पार तर चांदीने 3 लाखांचा टप्पा ओलांडला होता. सोनं-चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली दिसून येत असताना सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीवर लावण्यात येणारे आयात शुल्क कमी करावे, जीएसटी दरात कपात करावी, अशी मागणी केली सर्वसामान्यांकडून केली जात होती. अशातच आज 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या बजेटनंतर फ्युचर्स मार्केटमध्ये सोने-चांदीचे दर खाली आले आहेत.
हेही वाचा- Stock Market Crash: एक घोषणा आणि शेअर मार्केट गडगडला! सेन्सेक्स 2,400 अंकांनी कोसळला तर निफ्टी...
मल्टी कमोडिटी एक्सचेंजने सादर केलेल्या अहवालानुसार 29 जानेवारीला सोन्याचे दर 1.69 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते, त्यानंतर आज सोन्याचे दर 1.38 लाख रुपयांच्या आसपास पाहायला मिळत आहेत. तर चांदीच्या दरात सुमारे 1.36 लाख रुपयांची मोठी घसरण झाली असून 4.01 लाख रुपये प्रति किलो चांदी आज 2.66 लाख रुपयांवर घसरली आहे. त्याचसोबत सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.65 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 3.39 लाख रुपये प्रति किलोवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
सोने-चांदीच्या दरात एवढी मोठी घसरण होण्यामागच कारण काय?
बाजारातील या घसरणीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे जोरदार प्रॉफिट बुकिंग. गेल्या काही आठवड्यांत सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. कमी दरात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा नफा वसूल करण्याचा योग्य काळ ठरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि किंमतींमध्ये अचानक घसरण पाहायला मिळाली.
दुसरीकडे, फिजिकल डिमांडमध्ये घट हा देखील महत्त्वाचा घटक ठरला. दर प्रचंड वाढल्याने सामान्य ग्राहकांसह दागिने उद्योगाकडून खरेदी कमी झाली. लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम असूनही महागाईमुळे खरेदीवर मर्यादा आल्या, याचा थेट परिणाम बाजारातील मागणीवर झाला.