Middle East Crisis: मध्यपूर्व आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या अत्यंत तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. विविध देशांतील भारतीय दूतावासांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, अनावश्यक हालचाल टाळण्याचे आवाहन केले आहे. या संकटकाळात केंद्र सरकारसह महाराष्ट्र शासनही परदेशातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत गंभीर असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दूतावासांकडून सतर्कतेचा इशारा आणि सूचना
भारत सरकारने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथील भारतीय समुदायाला विशेष सूचना दिल्या आहेत. सर्व नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासांच्या संपर्कात राहावे, असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील मराठी नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि दूतावासांच्या समन्वयाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - ICC T20 World Cup 2026: विश्वचषकावर युद्धाचे सावट, इराणवरील हल्ल्यानंतर खेळाडूंच्या परतीचा मार्ग खडतर; ICC चा 'प्लॅन-बी' काय?
आपत्कालीन परिस्थितीसाठी 24x7 हेल्पलाइन सुविधा
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संबंधित देशांमधील भारतीय दूतावासांनी 24x7 हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल पत्ते जारी केले आहेत. दूतावास नियमितपणे परिस्थितीचे पुनरावलोकन करून नवीन सूचना जारी करत आहेत. खालीलप्रमाणे विविध देशांतील संपर्क तपशील उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
1. रामल्लाह (पॅलेस्टाईन)
फोन : +970592916418
ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in
2. दोहा (कतार)
फोन : 00974-55647502
ईमेल : cons.doha@mea.gov.in
3. रियाध (सौदी अरेबिया)
फोन : 00-966-11-4884697
WhatsApp : 00-966-542126748
टोल फ्री : 800 247 1234
ईमेल : cw.riyadh@mea.gov.in
4. तेल अवीव (इस्रायल)
फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in
5. तेहरान (इराण)
फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
6. अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री : 800-46342
WhatsApp : +971543090571
ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in
7. कुवैत
फोन : +96565501946
ईमेल : community.kuwait@mea.gov.in
8 बाहरीन
फोन : 00973-39418071
9. मस्कत
टोल फ्री : 80071234
WhatsApp : +96898282270
ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in
10. जॉर्डन
फोन : 00962-770 422 276
11. बगदाद (इराक)
फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899
वेबसाइट :https://eoibaghdad.gov.in
ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in