राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच संपूर्ण राज्यभरात अजित दादांच्या जाणाण्याने शोकाकुल व्यक्त केली जात आहे. असं असताना अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवर पिता अजित पवारांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी पोस्ट केलेले हे फोटो पाहून अजित पवारांचा कार्यकर्तावर्ग भावूक झाला आहे.
हेही वाचा- Sunetra Pawar: जबाबदारी वाढली आणि सुरक्षाही...; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आता 'झेड प्लस' सुरक्षा कवच
पिता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जय पवार हे सतत सोशल मीडियावर सक्रिय असलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट पाहता जय पवार हे पिता अजित पवार यांच्या अतिशय जवळचे असल्याचं समजतयं. जय पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या सोशल मिड्याच्या माध्यमातून अजित पवार यांची आठवण काढत भावनिक पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत म्हटले की, "Dad माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील"
हेही वाचा- Parth Pawar Clean Chit : 1800 कोटींच्या जमीन खरेदी-गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना 'क्लीन चीट'?
याआधी देखील जय पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात जय पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला पिता अजित पवारांसोबतचा फोटो जय पवार यांच्या लग्न सोहळ्यातील असल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. या फोटोमध्ये जय पवार हे अजितदादांना गच्च मिठी मारुन उभे होते. यानंतर जय पवारांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे, ही पोस्ट पाहून कोणाच्याही डोळ्यात टचकन पाणी येईल. आपल्या पित्यासाठी असलेले अपार प्रेम आणि निष्ठा याबाबत जय पवार यांनी मनातील भावना कॅप्शन म्हणून फोटोवर लिहिल्या आहेत.