Sunday, March 08, 2026 11:45:03 PM

Mahadev Munde Death Case: महादेव मुंडे मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; वाल्मिक कराडच्या घर कामगारांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी, अहवाल SIT च्या हाती

महादेव मुंडे मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती वाल्मिक कराडच्या घरात काम करणाऱ्यांचा नार्को चाचणी (Narco Test) आणि ब्रेन मॅपिंग (Brain Mapping) चा अहवाल लागला आहे.

mahadev munde death case महादेव मुंडे मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट वाल्मिक कराडच्या घर कामगारांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी अहवाल sit च्या हाती

Mahadev Munde Death Case:  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बीडमधील व्यापारी महादेव मुंडे मृत्यू प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक वळण देणारी माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती वाल्मिक कराडच्या घरात काम करणाऱ्यांचा नार्को चाचणी (Narco Test) आणि ब्रेन मॅपिंग (Brain Mapping) चा अहवाल लागला आहे. या वैज्ञानिक पुराव्यांमुळे हत्येचे गूढ उकलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

वैज्ञानिक चाचण्यांतून काय समोर येणार?
महादेव मुंडे यांचा मृत्यू होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, मात्र अद्याप मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले नव्हते. या पार्श्वभूमीवर, आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील SIT ने वैज्ञानिक चाचण्यांचा आधार घेतला. मुंबईतील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत अलीकडेच दोन संशयितांची नार्को चाचणी करण्यात आली. तसेच एका संशयिताची ब्रेन मॅपिंग चाचणीही पूर्ण झाली आहे. या चाचण्यांमध्ये संशयितांनी दिलेली उत्तरे आणि त्यांच्या मेंदूतील लहरींचा डेटा आता तपासाचा मुख्य आधार असणार आहे. हा अहवाल लवकरच न्यायालयात सादर केला जाण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?
21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांना धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे संपवण्यात आलं. या प्रकरणाला राजकीय वळणही लागले होते. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोपींना अटक व्हावी यासाठी अनेकवेळा आंदोलने केली, प्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्नही केला. या हत्येमागे 12 गुंठे जमिनीचा वाद असल्याचे बोलले जात असून, वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलांचे नाव या प्रकरणात सातत्याने घेतले जात आहे.

हेही वाचा - Amrawati Crime : मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं! चिकन खाण्याचा वाद पोहोचला टोकाला, 12 वर्षाच्या लेकाच्या मृत्यूची खोटी तक्रार आणि..., नेमकं घडलं काय?

SIT चा व्यापक तपास
SIT ने गेल्या सहा महिन्यांत तब्बल 200 लोकांची चौकशी केली असून 500 हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासले आहेत. एकूण 14 संशयितांच्या मानसशास्त्रीय चाचण्यांचे नियोजन करण्यात आले होते, ज्यापैकी 8 जणांची लाय डिटेक्टर चाचणी झाली आहे. आता नार्को आणि ब्रेन मॅपिंगच्या अहवालामुळे तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या काही दिवसांत मोठ्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री