Wednesday, February 18, 2026 09:18:47 AM

Chandrashekhar Bawankule : आता बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचं डोंगर कमी होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

कर्जावर व्याज आणि त्यावर परत व्याज वाढत गेल्याने अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली येतात. या सगळ्याचा विचार करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

chandrashekhar bawankule  आता बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचं डोंगर कमी होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

कर्जावर व्याज आणि त्यावर परत व्याज वाढत गेल्याने अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली येतात. आर्थिक ताण-तणावामुळे त्यांना रोजच्या गरजा भागवणेही कठीण होत जाते आणि कर्जाच्या अडचणींमुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी निराशेच्या भरात टोकाचा निर्णय घेण्याचा विचार करतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर आणि समाजावर खोल परिणाम होतो. या समस्या दूर करण्यासाठी वेळेत मदत आणि आधार देणे अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्याचा विचार करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

हेही वाचा- Mayor Election: महापौर' ठरला! अखेरच्या क्षणी 'या' नेत्याने टाकली गुगली; पाहा कोणाची लागली वर्णी

गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार प्रभावी पावले उचलली असल्याचे विधान बावनकुळे यांनी केल आहे. वर्षानुवर्षे शेतात राबणारे, मात्र वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले गरीब शेतकरी यांच्यासाठीच ही कर्जमाफी असणार असून, त्यांना आर्थिक आधार देणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान ही कर्जमाफी आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना नसून केवळ गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी असणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- Jay Ajit Pawar : दादांच्या आठवणीत जय पवार भावूक; सोशल मीडियावर शेअर केला अजित पवारांसोबतचा 'तो' फोटो अन् लिहिलं...
धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,"अनेक वर्ष शेतात राबून देखील शेतकरी कर्जमुक्त होत नाही. असे शेतकरी भावनिकरित्या खचून जाऊन आत्महत्ये सारखा टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. फक्त कर्जमाफीपुरते न थांबता, शेती उत्पन्न वाढवणे, खर्च कमी करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा सरकारचा विचार आहे." चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारकडून लवकरच कर्जमाफीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सम्बन्धित सामग्री