Thursday, November 13, 2025 01:36:24 PM

Phaltan Doctor case : अखेर फलटण डॉक्टर प्रकरणी SIT स्थापन, या महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तपास होणार

मुख्यमंत्र्यानी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले. याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

phaltan doctor case  अखेर फलटण डॉक्टर प्रकरणी sit स्थापन या महिला  ips अधिकाऱ्यांच्या  नेतृत्वात तपास होणार

महाराष्ट्रामध्ये फलटण येथील डॉकटर मृत्यूप्रकरण चांगलंच पेटलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने हातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिले होते. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर आरोप करण्यात आला.  त्याचप्रमाणे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव आल्याची तक्रारही तिने केली होती.  

याप्रकरणी राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर मृत्यूप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यानी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले. याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिला डॉक्टर मृत्यूचा तपास हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार  असल्याची चर्चा देखील सुरु होती. त्याबद्दलची अपडेट आता समोर आली आहे. 

हेही वाचा - Devendra Fadanvis On Phaltan Doctor Case : फलटण डॉक्टर मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना महत्त्वाचे आदेश, प्रकरणाला काय वळण लागणार ? 

दरम्यान आता प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते  यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

हेही वाचा - Phaltan Doctor death: डॉक्टर तरुणी रात्री हॉटेलमध्ये आली तेव्हा देहबोली..., निंबाळकरांच्या मर्जीतील हॉटेल मालकाने सगळंच सांगितलं

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना फलटण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.


सम्बन्धित सामग्री