मुंबई: मुंबई लोकल संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई लोकलमध्ये पडून 5 महिन्यांत 922 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहिती अधिकार (RTI) च्या उत्तरात समोर आली आहे. 1 जानेवारी ते 31 मे 2025 दरम्यान मुंबईत लोकल ट्रेनमध्ये 922 प्रवाशांचे अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यापैकी 210 मृत्यू हे चालत्या गाड्यांमधून पडून झाले आहेत.
हेही वाचा - नागपूर शिक्षण घोटाळ्यात मोठी अपडेट; आमदार संदीप जोशींच्या प्रश्नावर सरकारचं थेट उत्तर
ही धक्कादायक आकडेवारी लोकल प्रवासाची असुरक्षितता अधोरेखित करते. आता रेल्वे कार्यकर्ते आणि प्रवासी संघटनांनी दीर्घकालीन गर्दी, डब्यांची अपुरी संख्या आणि प्लॅटफॉर्म सुरक्षा उपायांचा अभाव याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा - 'मी मराठी शिकणार नाही' म्हणणं पडलं महागात; मनसे कार्यकर्त्यांकडून केडियांच्या ऑफिसची तोडफोड
दरम्यान, वरील आकडेवारीनुसार, पाच महिन्यांच्या कालावधीत उर्वरित 712 अपघाती मृत्यू हे ट्रॅक ओलांडण्यासह विविध कारणांमुळे झाले. सूत्रांनुसार, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणाली पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर दररोज 70 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करते.