राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड लक्षात आला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे हेलिकॉप्टरने निघाल्या होत्या. पण हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे उड्डाणापूर्वीच पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पंकजा मुंडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार करत आहेत. निवडणूक प्रचारासाठी पंकजा मुंडे आज लातूर दौऱ्यावर आहेत. लातूर दौऱ्यावर निघालेल्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला.
हेही वाचा- Jay Ajit Pawar : दादांच्या आठवणीत जय पवार भावूक; सोशल मीडियावर शेअर केला अजित पवारांसोबतचा 'तो' फोटो अन् लिहिलं...
हा बिघाड वेळीत लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे लातूरमधील पंकजा मुंडे यांच्या सभांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या. दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. 7 फेब्रुवारीला पार पडणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडें 3 फेब्रुवारी म्हणजे आज लातूरसह सोलापुरला दौऱ्यावर जाणार आहेत. सोलापुरातील मंद्रूप आणि कुंभारी अशा दोन ठिकाणी संध्याकाळी 6 आणि 8 वाजता पंकजा मुंडेंच्या सभा होणार आहेत. दरम्यान त्यापुर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथे सभा घेतली. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे झेप घेण्यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले.