Thursday, November 13, 2025 01:27:45 PM

अबब! 2 महिंद्रा थार, 2 फॉर्च्युनर, 7 ट्रॅक्टर, 150 बाईक्स; बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्यांना मिळणार इतकी बक्षीसं, पण कुठे?...

देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन 9 नोव्हेंबर रोजी तासगाव येथे करण्यात आलं आहे. या शर्यतीत विजेत्यावर बक्षिसांचा मोठा वर्षाव करण्यात येणार आहे.

अबब 2 महिंद्रा थार 2 फॉर्च्युनर 7 ट्रॅक्टर 150 बाईक्स बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्यांना मिळणार इतकी बक्षीसं पण कुठे

Bullock Cart Race In Sangli: शेतकऱ्यांच्या परंपरेचा आणि अभिमानाचा उत्सव ठरणारी बैलगाडा शर्यत यंदा सांगली जिल्ह्यात रंगणार आहे. देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन 9 नोव्हेंबर रोजी तासगाव येथे करण्यात आलं आहे. या शर्यतीत विजेत्यावर  बक्षिसांचा मोठा वर्षाव करण्यात येणार आहे. या शर्यतीत विजेत्यांना 2 महिंद्रा थार, 2 टोयोटा फॉर्च्युनर, 7 ट्रॅक्टर आणि तब्बल 150 बाईक अशी भव्य बक्षिसं देण्यात येणार आहेत. सांगलीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर बक्षीस वितरण होणार असल्याने या शर्यतीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Raj Thackeray On EC : निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले; म्हणाले, 'हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं...'

या ‘श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा अधिवेशन 2025’चे आयोजन डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना (शिंदे गट) नेते चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, राज्यभरातील हजारो शेतकरी या उत्सवाला हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा - EC On Maharashtra Election 2025 : महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर!; 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज 

दरम्यान, बैलगाडा शर्यतीत दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये स्पर्धा होणार असून, प्रत्येक विभागातील विजेत्याला थार आणि फॉर्च्युनर गाड्या देण्यात येणार आहेत. शर्यतीचा उद्देश शेतकऱ्यांच्या परंपरेला नवसंजीवनी देत बैलगाडा संस्कृतीला प्रोत्साहन देणं हा आहे, असं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या मेहनतीला योग्य दाद देणे हेच या शर्यतीमागचं खरं उद्दिष्ट आहे. सांगलीच्या भूमीतून या परंपरेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वासही यावेळी चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री