जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी पसरल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला काही दिवस उलटले असले, तरी या दुर्घटनेबाबतचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हा अपघात होता की घातपात, यावरून राजकीय वर्तुळात संशयाची लाट निर्माण झाली आहे. यावेळी अजित पवार यांचा मृत्यू विमानातील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची माहिती समोर आली होती.
हेही वाचा- Shivaji Rao Kokate Death : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक; सहकार महर्षी शिवाजीराव कोकाटे यांचे 93 व्या वर्षी निधन
मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षासह इतर विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून देखील अजित पवारांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दरम्यान या अपघातानंतर महत्त्वाचा पुरावा हा विमानाचा ब्लॅक बॉक्स होता. जो सापडण अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता. घडलेल्या अपघाताचं मूळ कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो. विमानात काही तांत्रिक बिघाड होता का? पायलटची चूक होती का? हवामान कारणीभूत होतं का? एखादा सिस्टीम फेल झाला का? या सर्वांची माहिती ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून मिळवता येते.
हेही वाचा- Sharad Pawar Meeting Sunetra Pawar : शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला, विलयनीकरणाची चर्चा होणार ?
दरम्यान अजित पवार यांच्या झालेल्या अपघातानंतर अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तो फॉरेन्सिक टीम आणि तपास यंत्रणा AAIB अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या हातात तपास करण्यासाठी देण्यात आला होता. यानंतर तब्बल सहा दिवसांनंतर अजित पवार यांच्या अपघाताचा उलघडा होणार आहे. 28 जानेवारीला सकाळी 8.45 च्या आसपास अजित पवारांच्या विमानात नेमका काय गोंधळ झाला हे आता ब्लॅक बॉक्सद्वारे समोर येणार आहे. ब्लॅक बॉक्स मधील महत्त्वाची माहिती रिक्व्हर करायला सुरुवात झाली आहे. ब्लॅक बॉक्समधला "डेटा रिकव्हरी" केल्यानंतर नागरी विमान महासंचनालय कडून अहवाल जारी केला जाणार आहे.