Wednesday, February 18, 2026 09:12:05 AM

Ajit Pawar Plane Crash: '...अन् तो कागद उडत उडत पायाजवळ आला'; अजितदादांच्या विमान अपघातस्थळी असं काय घडलं? कल्याणी नरुटेचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

या दुःखद घटनेच्या अनेक आठवणी आणि व्हिडिओ समोर येत असतानाच, बारामतीच्या एका सुनेने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे मन हेलावून टाकत आहे.

ajit pawar plane crash अन् तो कागद उडत उडत पायाजवळ आला अजितदादांच्या विमान अपघातस्थळी असं काय घडलं कल्याणी नरुटेचा तो व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. 28 जानेवारीच्या त्या 'काळ्या बुधवारी' झालेल्या भीषण विमान अपघाताने बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या अनेक आठवणी आणि व्हिडिओ समोर येत असतानाच, बारामतीच्या एका सुनेने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे मन हेलावून टाकत आहे.

पायापाशी आला जळलेला कागद अन्...
कल्याणी पारखे नरुटे या तरुणीने अपघातस्थळाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. कल्याणी ही मूळची नाशिकची असून बारामतीची सून आहे. अपघातानंतर त्याठिकाणी गेल्यावर तिला विमानातील एक जळलेला कागद उडत येताना दिसला. तो कागद विमानाच्या 'टेक्निकल चेकिंग'शी संबंधित होता. विशेष म्हणजे, त्यावर या विमानाची सह-वैमानिक (Co-pilot) शांभवी पाठक यांची स्वाक्षरी स्पष्टपणे दिसत होती. "दादांची आठवण उडत उडत माझ्या पायापाशी आली आणि मन एकदम भरून आलं," अशा शब्दांत कल्याणीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत ? पत्नीच्या इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ

70 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली 'ती' आठवण

कल्याणीने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 66 लाखांहून अधिक 'व्ह्यूज' मिळाले असून हा आकडा 70 लाखांच्या घरात जात आहे. "डोळ्यांसमोर एवढं सर्व विध्वंस दिसत असूनही, दादा आता आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाहीये," असे भावूक कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडिओ केवळ एक क्लिप नसून अजित पवारांच्या निधनानंतर जनमानसात असलेली हळहळ व्यक्त करणारे माध्यम ठरले आहे.

अपघाताच्या भीषणतेची प्रचिती
विमानतळाजवळ विमानाचा जळलेला सांगाडा आणि त्या अवशेषांमधील अशा लहान-सहान वस्तू पाहून येणारा प्रत्येक जण भावूक होत आहे. कल्याणीचा हा व्हिडिओ सध्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी यावर "आम्ही आमचा आधार गमावला" अशा प्रतिक्रिया देत श्रद्धांजली अर्पण करत आहेत.


सम्बन्धित सामग्री