Wednesday, February 18, 2026 08:34:17 AM

Bharat Gogawale: 'अजितदादांचं निधन होऊन बारा दिवसही उलटले नाहीत, तोवर खुर्चीसाठी ओढाओढ का?'; प्रफुल पटेलांच्या नावावरून भरत गोगावलेंचा तटकरेंना सवाल

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल यांचे नाव 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून घेतल्याने सुरू झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे.

bharat gogawale अजितदादांचं निधन होऊन बारा दिवसही उलटले नाहीत तोवर खुर्चीसाठी ओढाओढ का प्रफुल पटेलांच्या नावावरून भरत गोगावलेंचा तटकरेंना सवाल

Bharat Gogawale: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच आता महायुतीमधील अंतर्गत वादाचे कारण ठरत आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल यांचे नाव 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून घेतल्याने सुरू झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते भरत गोगावले यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना थेट लक्ष्य करत, "अनावधानाने नाव येतं कसं?" असा सवाल उपस्थित केला आहे. 

पटेल की पाटील? वादात गोगावलेंची उडी 
प्रफुल पटेल यांचे नाव चर्चेत आल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नसावा, तर कोणीतरी पाटील असावा' अशी भूमिका मांडली होती. त्यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, पियुष गोयल यांच्याकडून पटेलांचे नाव अनवधानाने आले आहे. तटकरेंच्या या सारवासारवीवर भरत गोगावले यांनी सडकून टीका केली. "जेव्हा गोष्टी आधीच ठरलेल्या असतात, तेव्हाच अशी नावे बाहेर येतात. अजित दादांच्या निधनाला अजून बारा दिवसही पूर्ण झाले नाहीत, तोवर पदांच्या वाटण्या आणि नावांच्या घोषणा सुरू झाल्या," अशा शब्दांत गोगावलेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : विमानाला आग, दादांच्या दोन्ही गुडघ्यातून धूर...; बारामतीच्या सरपंचांनी सांगितला अपघाताआधीचा थरार

भरत गोगावले आणि तटकरेंमध्ये पुन्हा जुंपली
सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकीय वैर रायगड जिल्ह्याला नवे नाही. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर हे वैर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. तटकरे आज इंदापूर येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेत आहेत. दादांच्या निधनानंतरची ही त्यांची पहिलीच मोठी सभा असून, गोगावलेंनी केलेल्या टीकेला ते या सभेतून काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 


सम्बन्धित सामग्री