Sunday, February 15, 2026 08:03:55 AM

Nylon Manja Accident : 12 सेंटीमीटर खोल जखम, 15 टाके... मांजाने गळा चिरल्यानंतर मृत्यूशी दोन हात करत थेट रुग्णालयात धावला चिमुरडा

धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये पतंगाच्या धारदार मांजाने एका 4 वर्षांच्या चिमुकल्याचा गळा तब्बल 12 सेंटीमीटरपर्यंत चिरला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

nylon manja accident  12 सेंटीमीटर खोल जखम 15 टाके मांजाने गळा चिरल्यानंतर मृत्यूशी दोन हात करत थेट रुग्णालयात धावला चिमुरडा

Nylon Manja Accident : मकर संक्रांतीच्या आनंवर नायलॉन मांजाच्या जीवघेण्या संकटाने विरजण पडल्याची घटना समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये पतंगाच्या धारदार मांजाने एका 4 वर्षांच्या चिमुकल्याचा गळा तब्बल 12 सेंटीमीटरपर्यंत चिरला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असतानाही या चिमुकल्याने दाखवलेले धाडस पाहून डॉक्टरही थक्क झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

कपिल पिंपळे हा चिमुकला आपल्या नातेवाईकांसोबत दुचाकीवरून जात होता. दुचाकीवर पुढे बसलेला असताना अचानक आकाशातून आलेला नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला फाससारखा आवळला गेला. क्षणार्धात कपिलचा गळा खोलवर चिरला गेला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. अत्यंत गंभीर अवस्थेत, एका हाताने गळ्याची जखम दाबून धरत या बालकाने रुग्णालय गाठले.

हेही वाचा - Prakash Ambedkar : 'संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी..' भाजपवर कडाडून टीका करत प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

15 टाके आणि डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न

कपिलला तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजा इतका धारदार होता की गळ्यावर 12 सेंटीमीटर लांब आणि खोल जखम झाली होती. अधिष्ठाता सयाजीराव भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करून तब्बल 15 टाके घातले. सुदैवाने, कपिलचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले असून सध्या तो अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहे.

हेही वाचा - Bawankule On Aditya Thackeray : 'सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिणारे...', बावनकुळेंची आदित्य ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका

प्रशासकीय बंदी कागदावरच?

दरम्यान, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार नायलॉन आणि चिनी मांजावर कडक बंदी असतानाही, बाजारपेठेत त्याची सर्रास विक्री सुरू आहे. आमच्या मुलाचा जीव जाता जाता वाचला, पण दुसऱ्या कोणावर अशी वेळ येऊ नये, अशी आर्त हाक कपिलच्या पालकांनी दिली आहे. दोन दिवसांवर संक्रांत आली असताना शहरात जीव मुठीत धरून फिरायची वेळ नागरिकांवर आली आहे.  
 


सम्बन्धित सामग्री