भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, "भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने आज सगळे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आम्ही सगळे जण भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे, अनेक ठिकाणी आमच्या सेटिंग जागा होत्या, त्या आम्हाला मिळालेले आहे त्यांच्यात सेटिंग जागा त्यांना मिळालेला आहे, यावेळेस जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी. कार्यकर्त्याची भावना असती ते व्यक्त करत असतो, नंतर तुम्ही बघितला असेल शहराच्या एक दोन दिवस शहराचा विषय संपला नंतर ते सगळे कार्यकर्ते कामाला लागले तसेच हे कार्यकर्ते देखील सगळे कामाला लागतील, कार्यकर्त्यांना जोश असतो त्यांनी मेहनत केलेले असते म्हणून त्याला वाटतं आम्हाला संधी मिळाला पाहिजे. सगळेजण दोन दिवसात पक्षाच्या शिस्तीच्या कामाला लागते. रामगिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही, महायुतीचा विजय जिल्हा परिषद मध्ये होणार आहे हे आम्हाला खात्री आहे. ठाकरे शिवसेना कोणाबरोबर जाईल याचा काही नक्की आहे का, रशीद मामाला घेऊन ज्या रशीद मामीवर दंगलीचे गुन्हे आहेत, त्याला घेऊन उभाठाने महानगरपालिका लढवली काय बोलायचं त्याच्याबद्दल..."