Wednesday, July 09, 2025 08:48:15 PM

भरधाव कारने दिली महिलेला धडक; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

जळगावात 'हिट अँड रन' चा प्रकार समोर आला आहे.  महाबळ परिसरात भरधाव कारने एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. या घटनेत वंदना सुनील गुजराथी ही महिला गंभीर जखमी झाली होती.

भरधाव कारने दिली महिलेला धडक उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

जुगल पाटील. प्रतिनिधी. जळगाव: नुकताच, जळगावात 'हिट अँड रन' चा प्रकार समोर आला आहे.  महाबळ परिसरात भरधाव कारने एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. या घटनेत वंदना सुनील गुजराथी ही महिला गंभीर जखमी झाली होती. 

हेही वाचा: 'सांगली जिल्हा परिषदेचा वर्ल्ड रेकॉर्ड योगा बोगस'; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप

या अपघातानंतर स्थानिकांनी मद्यधुंद अवस्थेत कारचालक तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तसेच जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. यादरम्यान जखमी महिलेवर उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोटू शिवपाल सैनी या तरुणाविरोधात रामानंद पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 'हिट अँड रन'चा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने तरुणाने काही वाहनांनाही धडक दिल्याची माहिती आहे.


सम्बन्धित सामग्री