Sunday, February 08, 2026 05:18:58 PM

Aaditya Thackeray : 'पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा...'; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी आणि कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे.

aaditya thackeray  पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन सणासुदीदरम्यान, जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. इतकंच नाही, तर वर्षानुवर्षे शेतकऱ्यांनी केलेली मेहनत काही मिनिटांच्या पावसामुळे पाण्यात गेले. बुधवारी पुरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते. 'मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करत मदत दिली जाईल', असेही आश्वासन यावेळी राज्य सरकारतर्फे देण्यात आले. अशातच, एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी आणि कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे. 

हेही वाचा: Raj Thackeray's Letter To CM: ओला दुष्काळ जाहीर करा! 'या' 5 मागण्यांसह राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

'राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मी आपणास सांगू इच्छितो की, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे, शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरपरिस्थितीमुळे, काही ठिकाणी तर शेतातील मातीच वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे जवळपास 50% किंवा त्यापेक्षाही जास्त नुसकान झाले आहे. ही परिस्थिती अत्यंत दु:खद आहे आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे', अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. 

पुढे, आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आपण आपल्या भाषणात, राज्यातील जनतेला येग्य वेळ येताच कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता ती वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची खूप गरज आहे. माझ्या माहितीप्रमाणे, यापूर्वी झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे जवळपास 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. या थकबाकीचे वितरण लवकरात लवकर करण्याचीही खूप गरज आहे. इतकंच नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे, 2 हजार 339 कोटी रुपयांच्या निधीला फक्त मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात मदतीचे वितरण करण्यासाठी बराच कालावधी लागेल. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना तात्काळ मदत पुरवण्यासाठी आणि योग्य वेळेत त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा'. 

'राज्यातील शेतकऱ्यांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे नियमांनुसार पंचनामा करण्याची गरज नाही. सरसकट सर्व शेतकऱअयांना मदत देणे, हे आपले कर्तव्य आहे. ज्याप्रकारचे नुकसान झालेले आहे त्याप्रमाणे आणि कोणत्याही प्रकारच्या निर्णयांमध्ये न अडकता शेतकऱ्यांना अपेक्षित आणि आवश्यक मदत तात्काळ करण्यात यावी. महोदय, आपणांस विनंती आहे की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्वरित आणि प्रभावी पावसे उचलावीत. जेणेकरून त्यांना योग्य वेळी मदत मिळू शकेल आणि त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल', अशी विनंती आदित्य ठाकरेंनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री