मुंबई: मुंबईतील हाजी अलीजवळील लोटस जेट्टीवर मोठी दुर्घटना घडली आहे. अस्थी विसर्जनासाठी आलेले 3 जण समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीला जिवंत वाचवण्यात आले. सध्या वाचण्यात आलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, मच्छिमारांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मच्छिमारांसह तिघांनाही बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
मृतांची ओळख संतोष विश्वेश्वर (51) आणि कुणाल कोकाटे (45) अशी आहे. याशिवाय संजय सरवणकर (58) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी समुद्र किनाऱ्यावर लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा - 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचं निधन; वयाच्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अस्थी विसर्जन करताना घडला अपघात -
शनिवारी तीन जण समुद्रात अस्थी विसर्जन करण्यासाठी आले होते. यादरम्यान ते समुद्रात बुडाले. पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती दिली. हाजी अली येथील 'लोटस जेट्टी' जवळ ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सायंकाळी 5:40 वाजता घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर पोलिस पथकाने मच्छिमारांच्या मदतीने सर्व लोकांना बाहेर काढले.
हेही वाचा - रेलिंग ओलांडून रुमाल काढण्यासाठी गेला अन् 300 फूट खोल दरीत पडला! आंबोली घाटातील घटना
अस्थी विसर्जनासाठी आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू -
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिघांना बाहेर काढल्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तिघांपैकी दोघांना मृत घोषित केले. त्याच वेळी, एक व्यक्ती जिवंत होती, ज्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.