Friday, February 13, 2026 12:16:27 AM

Navi Mumbai Shivsena Candidate : नवी मुंबईत युवा नेतृत्वाची झळ; नवी मुंबईत 21 वर्षीय तरुणी बनली शिवसेनेची नगरसेवक

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, महानगरपालिका निवडणुका निकालाच्या पार्श्वभूमिवर नवी मुंबईतून आणखी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

navi mumbai shivsena candidate  नवी मुंबईत युवा नेतृत्वाची झळ नवी मुंबईत 21 वर्षीय तरुणी बनली शिवसेनेची नगरसेवक

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, शहराच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळतो आहे. 111 जागांच्या महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 65 जागांवर विजय मिळवत नवी मुंबईत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अशातच नवी मुंबईतून आणखी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवी मुंबईत 21 वर्षीय तरुणी शिवसेनेची नगरसेवक बनली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार दीक्षा कचरे विजयी झाल्या असून तिच्यावर कौतूकांचा वर्षाव होत आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शिंदेंच्या शिवसेनेच्या 42 जागा निवडून आल्या, त्यामध्ये सर्वात तरुण 21 वर्षाची दीक्षा सुर्यकांत कचरे हिचा विजय झाला आहे. 


सम्बन्धित सामग्री