Wednesday, April 22, 2026 11:35:20 PM

Ladki Bahin Yojna: "येत्या 2-3 दिवसांत..." लाडक्या बहि‍णींसाठी आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे.

ladki bahin yojna quotयेत्या 2-3 दिवसांतquot लाडक्या बहि‍णींसाठी आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

महायुती सरकारने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी सुरु केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंतच्या प्रत्येक महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठरावीक कालावधीसाठी लाभ स्थगित झाला असला तरी त्याची जोडणी पुढ्या महिन्यात करून लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केला जात होता. फेब्रुवारीनंतर मार्च महिन्याचा हप्ता अजून देखील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. असं असताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे. या योजनेचा मार्च 2026 चा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. 

हेही वाचा- CM Devendra Fadanvis on Lockdown : "राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही", मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
यावेळी आदिती तटकरे ट्वीट करत म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे."

हेही वाचा- Ration Card Online Update : रॉकेल वाटपाला लवकरंच होणार सुरूवात, तर मग लगेच करा रेशन कार्ड अपडेट, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31मार्चपर्यंतची शेवटची संधी
या योजनेचा लाभ कायमचा मिळवण्यासाठी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक महिलांनी अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना तांत्रिक चुका केल्याचे समोर आले होते. अशा महिलांना आपल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता या मुदतीला फक्त 6 दिवस शिल्लक राहिले आहेत. जर या कालावधीत दुरुस्ती पूर्ण झाली नाही, तर एप्रिल महिन्यापासूनचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


सम्बन्धित सामग्री