मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. 'सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे' असं आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. मुंबईमध्ये पाणी तुंबल्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाल्यामुळे आदित्य ठाकरे संतापले आहे.
वरळी भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरल्याबाबत मुंबई मेट्रोने दिले स्पष्टीकरण
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
'आज आपण पाहत आहोत मुंबईत तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा पाऊस झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही सांगत आहोत की, ''नालेसफाई नीट झाली नाही''. मान्सूनपूर्व महापालिकेच्या बैठक असतात त्या पालिकेने घेतल्या नाही आणि स्वतःला इन्फ्रा मॅन बोलणारे व्हिजनरी बोलणारे जे आज कुठे आहेत ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईच्या पाहणीकडे जात होते. ते कुठे गायब झाले हाच प्रश्न आहे. पण त्यांनी खाल्लेला पैसा नागरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहेत, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहेत', असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा: विक्रमी पावसामुळे मुंबईत रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक प्रभावित