मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी प्रताप सरनाईकांना खडेबोल सुनावले आहेत. सदावर्ते म्हणाले की, प्रताप सरनाईक माझे मित्र आहेत. मात्र ते एक मंत्रीदेखील आहेत, असे मी त्यांना आधीही बोललो आहे. एखादा आदेश असो वा वक्तव्य त्यांनी जबाबदारीनं केलं पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सातवा वेतन आयोग देण्याची गोष्ट समोर आली होती. त्यावेळी त्यांची काय भूमिका होती हे उदय सामंत यांना विचारा. ते तार देत नाहीत... मी टीका करत नाही... पण प्रभू श्री रामाच्या बाबतीत ठरर उडवली होती. कष्टकऱ्यांचा ते आता अपमान करत आहे. मॅनेजिंग डायरेक्टर यांना त्यांनी विचारलं का. कष्टकरी तिथे जेवतं होतं... त्यांच्या समोर चप्पल घालून ते गेले. आजच्या दिवशी या देशातल्या सगळ्यात मोठ्या उत्सावाच्या दिवशी कारवाई केली. तुमच्यामध्ये दम असेल तर आधी त्यांना सातवा वेतन द्या. मराठा कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. आम्ही सूचना करत अहोत. प्रतापचं नाव असं होईल की एसटी डेपो विकणारा हा मंत्री आहे. सेल्फ डेव्हलोपमेंट करा. एसटीचा डेपो कष्टकऱ्याचं घर आहे. हे तुम्हाला खूप महाग पडेल. मराठा बांधवांना मुद्दामून त्रास दिला जात आहे.
हेही वाचा : Ambadas Danve : उदय सामत यांच्या ऑफरवर अंबादास दानवेंची प्रामाणिक कबुली, म्हणाले...