वैष्णवी हगवणे हे प्रकरण ताज असताना पुण्यात 27 वर्षीय दीप्ती मगर चौधरी या इंजिनिअरिंग केलेल्या विवाहितेने शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आपल जीवन संपवलं. दीप्ती मगर चौधरी हिला तिच्या सासरच्या माणसांकडून हुंडा आणि मुलगा होण्याच्या मागणीने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेणं, तिला टोमणे मारण या जाचाल कंटाळून अखेर दीप्तीने टोकाची भूमिका घेतला. मिळालेल्या माहितीनुसार दीप्तीच्या सासरच्यांनी तिला दुसऱ्यांदा दिवस गेल्याचे समजल्यावर तिच्या गर्भलिंगाची तपासणी करण्याची मागणी केली होती. तिने नकार दिल्यानंतर तिच्या गर्भलिंगाची बळजबरीने तपासणी करण्यात आली. ज्यामुळे मुलगी असल्याचे समजल्याबरोबर तिचे गर्भपात करण्यात आले. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे.
यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी वैष्णवी हगवणे प्रकरणात सुद्धा तुमच्या पदावर आलं होतं, त्यावेळी आम्हाला वाईट वाटलं होतं, त्यानंतर तुम्ही कायद्यात काय बदल केला? तुम्ही आरोपींना काय शिक्षा देणार आहात? सोरतापवाडीमध्ये मगर कुटुंबियातील सदस्यांनी आणि गावातील इतर महिलांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना असा प्रश्न केला.
हेही वाचा- "आम्हाला वंशाला दिवा हवायं...गर्भलिंग तपासणी कर...नाहीतर चालती हो..." सरपंचाच्या सुनेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर
यावेळी त्या म्हणाल्या, "याप्रकरणी चारही आरोपी, सासू-सासरा नवरा दीर यांना ताब्यात घेतलं जाणार नाही तोवर अंत्यविधी करणार नाही असं कुटुंबाने ठरवलं होतं. त्यानुसार पोलिसांनी कार्यवाही करत काल रात्री पती आणि सासूला अटक केली आहे. त्यांना ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन आरोपी फरार असून त्यांना लवकरच ताब्यात घेणार आहेत." "मगर कुटुंबियांची भेट घ्यायला आले होते. यावेळी वैद्यकीय पथकही आमच्याबरोबर होते. गर्भलिंग निदान चाचणी कायद्याने गुन्हा आहे. तरीही पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर पाचव्या महिन्यात त्या महिलेची गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात करण्यात आला. हा गर्भपात कोणत्या रुग्णालयात, कोणत्या क्लिनिकमध्ये, कोणत्या डॉक्टरांच्या निगराणीखाली झाला, याची तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत" पुढे त्या म्हणाल्या, "आमची टीम वेगळ्या पद्धतीने काम करते. कायदा हा खूप कठोर आहे. कायद्याच्या चौकटीतून या सगळ्या प्रक्रिया होत राहतात. महाराष्ट्रातील कायदा हा भारतातील सर्वात सक्षम काम करतो. म्हणून तुम्हाला काही शंका असतील तर जरुर सांगा. या आधीचे दोन आरोपी आपल्या पीसीमध्ये आहेत. आपणच आपल्या लेकींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू. आता आपणच ही शपथ घेऊ".
हेही वाचा- Pune Crime : आधी लेकाचा जीव घेतला, नंतर लेकीवरही प्राणघातक हल्ला... वाघोलीत जन्मदात्या आईच्या क्रूर कृत्याने संपूर्ण शहर हादरलं
नेमकं प्रकरण काय?
7 वर्षांपूर्वी सोन्या-नाण्याने मढवून आणि लाखो रुपये खर्च करून दीप्तीचा विवाह अत्यंत शाही थाटात पार पडला होता. तिची सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडीच्या विद्यमान सरपंच असून सासरे कारभारी चौधरी हे पेशाने शिक्षक आहेत. सासरचे प्रतिष्ठित घर असल्याने दीप्तीच्या वडिलांनी लग्नात 50 तोळे सोने हुंडा म्हणून दिले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच दीप्तीचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींनी दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, छळाची सीमा ओलांडली गेल्याने दीप्तीने शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आपल जीवन संपवलं.