जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर अनेकांकडून यात घातपात असल्याचा दावा केला जात आहे. यावर शरद पवार यांनी हा कोणताही घातपात नसून अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे. याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- Mahadev Jankar On Ajit Pawar Death : "...अन् दादांसोबतचा तो प्रवास करता आला नाही" महादेव जानकर अजित पवारांच्या विमानातून करणार होते प्रवास
यावर अरविंद सावंत म्हणाले की, "आज आपल्यातले एवढे मोठे नेते, मोठा माणून त्यांच निधन झालं आहे. ज्या पद्धतीने त्यांचा अपघात झाला... ते काहीही असूदे कोणाची चूक असूदे किंवा नसूनदे, हा अपघात असेल किंवा घातपात असेल... कोणत्याही ठोस तपासणी शिवाय त्यावर आपण आपलं मत देण योग्य ठरत नाही. माझी पण अशीच मागणी आहे की, अजित पवारांच्या या अपघाताची पुर्ण शहानिशा झालीच पाहिजे. तसेच शरद पवार यांनी कालच सांगितलं की, यात कोणताही कटकारस्थान नसून हा निव्वळ एक अपघात आहे. यात राजकारण आहे की नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण अपघात तर झालाय ना... त्याचा पण तपास नाही करायचा का?"