Friday, March 13, 2026 06:57:12 AM

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा घातपात की अपघात? CID च्या तपासात धक्कादायक माहिती समोर, अधिकाऱ्यांनी सांगितली संपूर्ण माहिती

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी तपासाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली.

ajit pawar plane crash अजित पवारांचा घातपात की अपघात cid च्या तपासात धक्कादायक माहिती समोर अधिकाऱ्यांनी सांगितली संपूर्ण माहिती

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचा दावा केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी तपासाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली.

तपासाची चक्रे फिरली: घातपाताचा संशय?
पवार कुटुंबाच्या मागणीनंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. गेल्या 28 दिवसांपासून सुरू असलेल्या या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सुनील रामानंद यांनी स्पष्ट केले की, "हा केवळ एक अपघात होता की त्यामागे एखादा मोठा गुन्हेगारी कट (Criminal Conspiracy) होता, या दिशेने आमचा तपास सुरू आहे. आम्हाला काही अत्यंत महत्त्वाचे पुरावे मिळाले असून तपास अतिशय व्यावसायिक पद्धतीने सुरू आहे."

तपासातील प्रमुख मुद्दे 
तपासादरम्यान सीआयडीच्या हाती काही ठोस तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे लागले आहेत. विमान अपघातांशी संबंधित AAIB (Air Aircraft Accident Investigation Board) या संस्थेशी सीआयडी सतत संपर्कात आहे. जर तपासात घातपाताचे किंवा षडयंत्राचे पुरावे अधिकृतपणे सिद्ध झाले, तर तातडीने गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला चालवण्याची तयारी विभागाने केली आहे. डीजीसीए (DGCA) आणि इतर संबंधित यंत्रणांचे तांत्रिक अहवाल येणे अजून बाकी आहे. हे अहवाल प्राप्त होताच तपासाचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असंही सुनील रामानंद यांनी यावेळी नमूद केलं. 

हेही वाचा - Rohit Pawar on VRS Aircraft Company : 'विमान खराब होतं तर दादांना का दिलं...?', पत्रकार परिषदेदरम्याने रोहित पवारांचा संताप

तपासाचा वेग आणि सीबीआयची भूमिका
राज्य सरकारने हा तपास सीबीआयने (CBI) ताब्यात घ्यावा यासाठी केंद्र सरकारकडे यापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. 'तपासात मोठी प्रगती झाली असून, एएआयबीचा तांत्रिक अहवाल या तपासाचा कणा असेल,' असेही रामानंद यांनी नमूद केले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, या हाय-प्रोफाईल मृत्यूमागचे गूढ लवकरच उकलण्याची चिन्हे दिसत आहेत.


सम्बन्धित सामग्री