Tuesday, February 17, 2026 09:08:53 PM

Ajit Pawar PMC Election : 'पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये माझाच महापौर होणार, मॅजिक फिगर गाठणार'; अजितदादांचं भाजपला आव्हान

ajit pawar pmc election  पुणे पिंपरी चिंचवडमध्ये माझाच महापौर होणार मॅजिक फिगर गाठणार अजितदादांचं भाजपला आव्हान

पुणे : महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशीदेखील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना पाहायला मिळाल्या. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, ठाकरे सेना यांसह इतर सर्वांनीच प्रचाराचा जोर कायम ठेवला. राज्यातील लक्षवेधी ठरलेली पुण्यातील भाजप विरूद्ध राष्ट्रवादी ही लढत प्रचारांमधील भाषणांमुळे आणखीनच रंजन ठरली. यातच आज महायुतीत असलेले उपमुख्यमंत्री मात्र महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटासोबत लढणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर तोफ डागली. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचाच महापोर बसेल, अशी आशा व्यक्त केली. 

हेही वाचा : Devendra Fadnavis : आम्ही ठरवलं होतं पण, अजित पवारांनी 'तो' शब्द पाळला नाही...देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील सभेत व्यक्त केली खदखद

अजित पवार म्हणाले की, 

जे लोक आमच्या धोरणांवर टीका करताहेत त्यांना पुण्यातील सत्ता गामावण्याची भीती आहे. आज मुख्यमंत्री पुण्यात आले. ते म्हणाले की 15 तारखेनंतर महायुती अभेद्य राहील. पण ते पुढे असं म्हाणाले की काहीजण फुकटची आश्वासनं देऊन मला बाजीराव म्हणा असं म्हणताहेत. पण पहिले बाजीराव पेशवे कर्तृत्ववान होते, मनगटाच्या जोरावर त्यांनी कारभारावर केला. मुख्यमंत्री म्हणाले की 15 तारखेला उठा अलार्म बंद करा, मतदान केंद्रावर जा आणि कमळाचे बटन दाबा. पण मी म्हणतो सकाळी लवकर उठा, अलार्म बंद करा पण मतदान केंद्रावर जाऊन घड्याळाचेच बटन दाबा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.


सम्बन्धित सामग्री