Friday, February 13, 2026 06:21:45 PM

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी वैमानिकाने केला होता मेडे कॉल, कंट्रोल रूमला पोहचवला आपत्कालीन संदेश

विमानातील गंभीर परिस्थिती आणि तांत्रिक बिघाडामुळे हा संदेश देण्यात आला होता. या घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.

ajit pawar plane crash अपघातापूर्वी वैमानिकाने  केला होता मेडे कॉल कंट्रोल रूमला पोहचवला आपत्कालीन संदेश

बारामती: मुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या घटनेशी संबंधित अनेक गंभीर बाबी हळूहळू उघड होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी अपघातावेळी पाहिलेल्या धक्कादायक दृश्यांची माहिती दिल्यानंतर आता या अपघाताशी संबंधित एक महत्त्वाची तांत्रिक माहिती पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात होण्यापूर्वी विमानाच्या वैमानिकाने कंट्रोल रूमला ‘मेडे’ (Mayday) असा आपत्कालीन संदेश पाठवला होता. विमानात अत्यंत गंभीर आणि नियंत्रणाबाहेरील परिस्थिती निर्माण झाल्यावर वैमानिकाकडून ‘मेडे’ हा शब्द सलग तीन वेळा उच्चारला जातो. ही सूचना थेट एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमपर्यंत पोहोचते आणि विमानाला तातडीच्या मदतीची गरज असल्याचा इशारा दिला जातो.

‘मेडे’ या शब्दाचा अर्थ पायलटला तात्काळ आणि आपत्कालीन मदतीची गरज आहे, असा होतो. विमानातील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास हा कॉल वापरण्यात येतो. विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास, लँडिंग किंवा टेकऑफ शक्य नसल्यास, अथवा परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्यास अशा वेळीच हा संदेश दिला जातो.

हेही वाचा: Devendra Fadnavis: 'दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला' देवेंद्र फडणवीस भावनिक प्रतिक्रिया

‘मेडे’ हा फ्रेंच भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ ‘हेल्प मी’ म्हणजेच ‘मला मदत हवी आहे’ असा होतो. हा शब्द अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत वापरला जातो आणि पायलटवर असा प्रसंग क्वचितच येतो, असे विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, वैमानिकाने मेडे संदेश पाठवल्यानंतरही काही क्षणांतच विमानाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, मेडे कॉलनंतर नेमकी कोणती परिस्थिती उद्भवली, याचा तपास केला जात आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे राज्यासह देशभरात शोककळा पसरली असून, मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र हादरला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं


सम्बन्धित सामग्री