Thursday, March 12, 2026 10:29:36 PM

Amol Kolhe On Chhagan Bhujbal: 'अजितदादांना भुजबळांना राज्यसभेवर पाठवायचं होतं, पण...'; अमोल कोल्हेंचा खळबळजनक दावा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्याख्यानानंतर कोल्हे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

amol kolhe on chhagan bhujbal अजितदादांना भुजबळांना राज्यसभेवर पाठवायचं होतं पण अमोल कोल्हेंचा खळबळजनक दावा

Amol Kolhe On Chagan Bhujbal:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक मोठी गुपितं उघड केली आहेत. "छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाऊन संसदेत प्रतिनिधित्व करावे, अशी स्वतः अजित पवार यांची इच्छा होती," असा खळबळजनक खुलासा कोल्हे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्याख्यानानंतर कोल्हे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. छगन भुजबळ यांच्या अस्वस्थतेवर बोलताना ते म्हणाले, "आमच्या अंतर्गत चर्चेत अजितदादांनी एकदा बोलून दाखवले होते की, भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या नेत्याने राज्यसभेवर जाणे आवश्यक आहे. जेव्हा अभ्यासू नेत्याऐवजी केवळ निवडणूक रणनीती आखणाऱ्या आणि धनशक्ती असणाऱ्या व्यक्तींना राज्यसभेची संधी मिळते, तेव्हा भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याची अस्वस्थता होणे स्वाभाविक आहे."

विलीनीकरण आणि अंतर्गत वाद
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, कोल्हे यांनी सावध पवित्रा घेतला. "याबाबतच्या चर्चांविषयी मला अधिकृत माहिती नाही. सुनेत्रा पवार किंवा जयंत पाटील यांच्या संभाव्य जबाबदाऱ्यांबाबत ज्यांच्याशी चर्चा झाली, तेच यावर अधिक स्पष्ट बोलू शकतील," असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा - 'जो भावाचा नाही झाला, तो गावाचा काय होणार?', ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

सीसीटीव्ही फुटेजवरून सरकारला घेरले
यावेळी कोल्हे यांनी रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचेही समर्थन केले. "जर कोणत्याही घटनेचे सत्य समोर आणायचे असेल, तर सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ का केली जाते? फुटेज मिळत नसेल तर संशय अधिक बळावतो. या प्रकरणात 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' झालेच पाहिजे," अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.  


सम्बन्धित सामग्री